Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना काळातही रियल ॲकॅडमीची सामाजिक बांधिलकी

परिसरातुन कौतुकांचा वर्षाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी - सिद्धार्थ सांबरे

पालघर : कोराना काळातही रियल अकॅडमीने विविध सामाजिक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला वसा कायमच ठेवला आहे. त्यांच्या या कामाचे विविध स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे..

वाडा तालुक्यातील रियल ॲकॅडमी ही खाजगी शिक्षण संस्थेत गेली अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यरत असून या संस्थेने विद्यार्थी गेले अनेक वर्ष अव्वल ठरण्याचा बहुमान कायम ठेवला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

real academy

पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शिकवणी वर्ग रियल अकॅडमीच्या माध्यमातून घेतले जात असून या संस्थेचे विद्यार्थीही सातत्याने गुणवत्ता यादीत ही झळकत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गेल्या (सन २०२०) वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऐवजी ऑनलाईनचा मार्ग अवलंबवावा लागला.
परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून रियल ॲकॅडमीचे शिकवणी वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने आपला समाज सेवेचा वसा ही कायम जपला असून रियल सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात आहे.

या रियल संस्थेचे संचालक विशाल ठाकरे व शशांक ठाकरे यांनी सामजिक बांधिलकी म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला असून कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई – वडीलांनी प्राण गमावले आहे अशा विद्यार्थ्यांचे पैशां अभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मोफत शिकवणी घेणार असल्याचे जाहीर केले असुन त्यांचे हे एक सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून त्यांच्या या निर्णयाचे परिसरातुन कौतुकांचा वर्षाव आहे.

रियल अकॅडमी व रियल संस्था नेहमीच समाजोपयोगी कार्य करण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार, समाज गौरव पुरस्कार देवून दरवर्षी गुणवंतांचा सन्मान केला जातो.

तर कोरोनाच्या काळात ही रियलने खरी रियलमध्ये कृती दाखवून आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवून रियलच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

कोरोना काळात गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच वर्षभरात सॅनिटायझर, मास्क, कचरा कुंड्या, सॅनिटायझर स्टँड यांसह अन्य वस्तूंचे वाटप शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, पत्रकार संघ, पोलीस स्टेशन, नगर पंचायत या ठिकाणी केले आहे.

या बरोबरच कोरोना काळात आरोग्य विषयक जनजागृतीसाठी ही रियलकडून एस. टी स्टँड व अन्य सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमित प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

दरम्यान, शैक्षणिक क्षेत्रात आपला दर्जा टिकवून ठेवण्या बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रियल संस्थेचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

हे देखील वाचा  :

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

आरोग्य विभागात 2226 पदांची जम्बो भरती!

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

 

Comments are closed.