Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-X) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत..

IBPS या भरतीअंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँक (RRB) ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk), ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिसर स्केल II आणि III रिक्त पदे भरली जाणार आहेत. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जारी जाऊन उच्छुक उमेदवार ८ जून २०२१ ते २८ जून २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नौकरीसंदर्भ विषयक अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com या वेबसाईट वर जाऊन नौकरी हा पर्याय तपासावा

विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा
ऑफिसर असिस्टंट व ऑफिसर स्केल पदांच्या जागा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

५०५६

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

४११९

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

२५

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

४३

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

०९

ऑफिसर स्केल-II (लॉ)

२७

ऑफिसर स्केल-II (CA)

३२

ऑफिसर स्केल-II (IT)

५९

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

९०५

१०

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

१५१

एकूण

१०४६६

 

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ करिता कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे
  • पद क्र. २ करिता कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ३ करिता (i)५०% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ४ करिता (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ५ करिता (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ६ करिता (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षाचा अनुभवअसणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ७ करिता (i) CA  (ii) 01 वर्षाचा अनुभवअसणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ८ करिता (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र. ९ करिता (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.१० करिता (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.(ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

०१ जून २०२१ रोजी पात्र उमेदवाराचे वय

  • पद क्र. १ करिता १८ ते २८ वर्षापर्यंत
  • पद क्र. २ करिता: १८ ते ३० वर्षापर्यंत
  • पद क्र. ३ ते ९ करिता २१ ते ३२ वर्षापर्यंत
  • पद क्र. १० करिता २१ ते ४०वर्षापर्यंत

अनुसूचित जाती(SC) आणि अनुसूचित जमाती(ST) प्रवर्गाला अधिकचे ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.

इतर मागास वर्गीय(OBC) प्रवर्गाला अधिकचे ३ वर्ष सूट देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी ८५० /- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १७५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ जून २०२१ ते २८ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

परीक्षा शुल्क :

१) सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – ८५० रुपये

२) एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी – १७५ रुपये

परीक्षा दिनांक :

पूर्व परीक्षा: ऑगस्ट २०२१

एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१

वेतन :

ऑफिस असिस्टेंट पदासाठी ७००० ते १९३०० वेतन निश्चित केले आहे, तर,ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल २ पदांसाठीचे सरासरी वेतन १४००० ते २८००० रुपयांपर्यंत आहे. तसेच ऑफिसर स्केल ३ पदासाठी २५००० ते ३१५०० वेतन निश्चित केले आहे.

निवड प्रक्रिया

IBPS RRB पीओ किंवा क्लर्क भरती परीक्षा तीन टप्प्यांत आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा (IBPS Prelims exam), दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा (IBPS Mains exam) होते. मेन्स परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुलाखतीसाठी (Interview) आणि प्रमाणपत्र पडताळणीसाठी (DV) यादी तयार केली जाते. मुलाखत आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे संस्था अधिकृत वेबसाइटवर एक प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट तयार करते.

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास IBPS च्या https://ibps.in/ वेबसाईट वरून माहिती प्राप्त करू शकता.

संपूर्ण जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज :

हे देखील बघा :

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर

Comments are closed.