Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी ३७ व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा-२०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांना दिनांक १७ मे २०२१ ते १० जून २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नौकरी हा पर्याय तपासावा.

शैक्षणिक पात्रता :  उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वयोमर्यादा : वयाची अट नाही

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि इतर मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ विशलेष मागासवर्गी/ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६५०/- रुपये आहे.

परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना दिनांक १७ मे २०२१ ते १० जून २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करावी – जाहिरात पाहा

अधिकृत माहितीसाठी Maharashtra State Eligibility Test (MH-SET) for Assistant Professor च्या अधिकृत वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

 

हे देखील वाचा :

(BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 567 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

Comments are closed.