Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अँनिमल वेल्फेअर संस्था गडचिरोली यांच्या पुढाकाराने बांधला वनराई बंधारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : पर्यावरणाचे रक्षण करण्यात मोलाची भूमिका असलेल्या वनराईमुळे पशु, पक्षी, वृक्ष, वेली आदींचे संरक्षण व संवर्धन होते. परंतु उन्हाळ्यात पशु, पक्षी, वृक्ष आदींचे पाण्यावाचून मोठे नुकसान होते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. पशु, पक्षी पाण्यावाचून मृत्युमुखी पडतात. या बाबीची दखल घेत पावसाळ्यातील पाणी अडवून जमिनीतील पाणी पातळी वाढावी, पशु पक्षांना पाणी मिळावे याकरिता सिमेंट च्या २०० रिकाम्या बॅग मध्ये रेती भरून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

हिरवेगार निसर्ग सर्वांनाच आकर्षित करतो. हिरवी वनराई शुद्ध हवा देते, वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करतात. परंतु या गोष्टी निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण व त्यांची निगा राखणे आवश्यक आहे. यामुळे वृक्षारोपण करून जतन करण्यासाठी व पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने गडचिरोली वनविभागातील उपक्षेत्र गुरवळा व पीपल फॉर एनवोरमेन्ट अँड अँनिमल वेल्फेअर संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा बांधण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

                                                बंधारा बांधतांना

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, गुरवळा चे क्षेत्रासहायक ए.आर.कन्नमवार, येवली नियतक्षेत्राचे वनरक्षक डी. एन. दुर्गमवार, संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुरवळा चे अध्यक्ष निलेश गेडाम, उपाध्यक्ष विलास भोयर, पीपल फॉर एनवोरमेन्ट & अँनिमल वेल्फेअर संस्थेचे अजय कुकडकर, महेंद्र गांवडे ,चेतन शेंडे, सौरभ सातपुते, मनोज पिपरे, कृनाल इंगोले, विनय मड़ावी, क्षितिज बोदिले, नयन काहले, मृणाल राऊत, मीनल इटनकर, उमंग चौधरी, आर.एस. दुर्गे , आशु सोमनकर, शुभम दुधबळे, कुणाल निमगडे, वनमजुर प्रभाकर निकुरे, चंदू जुवारे, गुणवंत बाबनवाडे, मकसूद अली सय्यद, के.बी. मडावी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 37 कोरोनामुक्त, तर 34 नवीन कोरोना बाधित

आरमोरी नगरपरिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नितीन गौरखेडे यांना तात्काळ निलंबित करा – महाराष्ट कामगार युनियनची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.