Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना जनजागृतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार प्रेरणादायी – जिल्हाधिकारी गुल्हाने

'श्र्वास पुन्हा घेण्यासाठी' कवितासंग्रहाचे प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटात सर्वस्तरातून सर्वसामान्यांसाठी कार्य करणे गरजेचे आहे. शासनाच्या उपक्रमाची व्यापक जनजागृती व्हावी म्हणून जिल्ह्यातील साहित्यिकांनी कोरोना निर्मुलनासाठी कवितांतून जनजागृती केली. कवी-लेखकांनी घेतलेला पुढाकार अतिशय प्रेरणादायी असून कल्याणकारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर व पंचायत समीती गोंडपिंपरीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ या कोरोना लसीकरणाबाबत संदेश देणा-या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी शुभेच्छा दिल्या. यासाठी विशेष पुढाकार घेणारे गोंडपिपरीचे सहायक गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे, फिनिक्सचे अध्यक्ष कवी नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’ या कोरोनाविषयक लसीकरण जनजागृतीच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह संपादित केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर

संदेश कोरोना लसीकरणाचा या विषयावर कविंचे ऑनलाईन कविसंमेलन घेण्यात आले. सदर कविता जनजागृतीच्या उद्देशाने पुस्तक रुपाने संपादित करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, धर्मेंद्र कनाके, जयवंत वानखडे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, विजय वाटेकर, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, मिलेश साकूरकर, अरुण घोरपडे, बि.सी.नगराळे, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाजी गावंडे यांच्या कवितांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून दखल

कोरोना निर्मुलनासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या साहित्यातून जनजागृती करणा-या या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून विशेष दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, मुख्य लेखा अधिकारी अशोक मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोमनाथे, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या काळात साहित्याचा सकारात्मक उपयोग करणा-या लोकहितावह अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा :

12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती

वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 

Comments are closed.