Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

ओबीसी आयोगाचे गठन करून ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली,  दि.14 जून : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी बांधवांची आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ओबीसी बांधवांना आरक्षण मिळवून देऊन त्यांना न्याय देण्यासाठी खा. अशोक नेते यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल मा. श्री भगतसिहजी कोश्यारी यांची भेट घेतली व ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करून ओबीसी राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन त्वरित करण्यासाठी राज्य शासनास निर्देश देण्याची मागणी केली. यावेळी ओबीसींचे नेते तथा भाजपचे ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मा बाबुरावजी कोहळे, जीपचे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, सुरेश राठोड उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भेटी दरम्यान खासदार अशोक नेते यांनी राज्यपाल महोदयांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात आदेश देतांना राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन यथाशिग्र करण्याचे निर्देश देत राज्यातील ओबीसी समाजाचा एमपेरियल डेटा जमा करून तो तात्काळ न्यायालयास सादर करण्याचे दिशा निर्देश केलेले असतांना राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाचे गठनही अजूनही केलेले नाही त्यामुळे ओबीसी समाजावर घोर अन्याय होत आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मागासवर्गीय आयोगाचे गठन करण्यात न आल्याने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळे आपण याची जाणीव ठेवून राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्यपाल महोदयांकडे केली.

हे देखील वाचा  :

तेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 47 कोरोनामुक्त, तर 11 नवीन कोरोना बाधित

आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.