Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – डॉ. आशीष विटनकर

बार्टी कडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दिनाच्या औचित्य ग्रामीण रुग्णाल कोरची येथे वृक्ष लागवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

कोरची : सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन वायूची कमीपणा भासू लागली आहे. याच कारणाने ऑक्सिजन वायूचे जाणीव होऊ लागले आहे. म्हणूनच तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. याचेच औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बार्टी कडून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या निमित्य ग्रामीण रुग्णालय कोरची येथील चिकित्सक डॉ. आशीष विटनकर आणि डॉ. राहुल राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन समतादूत जयलाल सिंद्राम जिल्ह्याचे प्र. अ. मनीष गणवीर यांच्या मार्गदर्शनात पार पडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी वृक्षारोपण करिता रुग्णालयातील कर्मचारी वर्ग सिस्टर अश्विनी नंदागवळी, प्रतीक्षा भाजीपाले, हेमंत महानंदे, रवींद्र बावने, नूतन देशमुख, अविनाश ढोकरमारे, रघुनाथ जमकातन, सचिन घाटगुमर, राजू सोनार, प्रेमदासजी गोटा उपसरपंच, समीर सिंद्राम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

हे देखील वाचा :

तेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी

ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 47 कोरोनामुक्त, तर 11 नवीन कोरोना बाधित

 

Comments are closed.