Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

कोरची : आज भाजप पक्षाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यामध्ये निवडणुका निरस्त करून ओबीसी संपवण्याचा राजकीय डाव हाणून पाडण्याकरिता कुरखेडा कोरची राष्ट्रीय महामार्ग वरील झनकारगोंदी फाट्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील निवडणूक ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट रचून समस्त ओबीसी बांधवांच्या भावनाला ठेच पोहोचविली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजात प्रचंड रोष असल्याचा मत भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे धोकेबाज असून ओबीसी व मागासवर्गीय समाजाच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप भाजप पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्व निर्णयाविरोधात आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये कुरखेडा, कोरची राष्ट्रीय महामार्ग वरील झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी व निषेध करत व्यक्त करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष कीसन नागदेवे, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडी चे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, जिल्हा सचिव प्रा देवराव गजभिये, जिल्हा महामंत्री अजा मोर्चा आनंद चौबे, कमल खंडेलवाल, रामकुमार नाईक, नंदलाल पंजवानी, केशव मोहुर्ले, गोविंद दरवडे, महादेव बन्सोड, विलास अंबादे, सदाराम नुरूटी, मेघशाम जमकातन, दामोधर येवले, रवींद्र बनसोड, सुरेश काटेंगे, अनिल वाढई यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते, तर आंदोलनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार व कायदा सुव्यवस्था बाधित राहावा म्हणून बेडगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

हे देखील वाचा  :

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य माहिती आयोगाचे आदेश

नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

Comments are closed.