Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुशांत सिंह सोबत सहकलाकाराच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

‘काय पो छे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत सहकलाकार म्हणून काम केले होते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. ‘काय पो छे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूत सोबत सहकलाकाराच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील मॅकलॉडगंज मधील जोगीवाडा रोडवरील कॅफेजवळ असिफ यांनी आपले आयुष्य संपवले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आसिफ यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. आसिफ यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुळचे अमरावतीचे असणारे आसिफ बसरा हे गेल्या 5 वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची परदेशी मैत्रीण देखील राहत होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माध्यमांच्या वृत्तानुसार आज दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्याच कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.