नागपूरातील लाव्हा गावात भेसळयुक्त मिठाई बनविणाऱ्यावर अन्न व औषध विभागाची धाड.
पावणे दोन लाखाचा माल जप्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १२ नोव्हेंबर: सध्या दिवाळीच्या सणानिमित्य आप्तस्वकीय परीजनांना गोड मिठाई भेट देऊन सन साजरा करण्याची तयारीत आहेत. मिठाई दुकानात मोठ्या प्रमाणावर रेलचेल आहे मिठाई व गोडधोड वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ भेसळघोर घेत आहेत.
आज रोजी मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून नागपूर येथील लाव्हा गावात बनावट भेसळयुक्त खवा (बर्फी) करणाऱ्या इसमावर F&D विभागासह संयुक्त कारवाई केली असता 553 किलो खवा 1,65,900 रुपये किमतीचा तसेच 8,000 रुपये किमतीची किनमिड मिल्क पावडर असा एकूण 1,73,900 रुपयांचा माल मिळून आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस उपायुक्त सो. परिमंडळ,1 नूरूल हसन ,व मा. सहा. पोलीस आयुक्त, MIDC विभाग,नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, अधिकारी व स्टाफने केलेली आहे.
Comments are closed.