Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर  9 सप्टेंबर :  पणन हंगाम 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. नोंदणी करण्याचा कालावधी 3 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत निर्धारित करण्यात आला आहे.

त्यानुसार सदर हंगामातील धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दि. 30 सप्टेंबर अखेर आपल्या नजीकच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण कागदपत्र आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा:

भुमिहिन दारिद्रय रेषेखालील आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री धारकांनी जमीन विक्री बाबतचे प्रस्ताव सादर करावे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत

 

Comments are closed.