Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर 9 सप्टेंबरअवैधरित्या होणा-या रेतीच्या वाहतुकीवर प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून रेती तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव करून शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा केला जात आहे.

वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना अवैध रेतीसाठयाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलेश पांडे यांच्यासमवेत मौजा पाटाळा, तालुका भद्रावती येथील रेती घाटावर छापा मारून 3059 ब्रास एवढा अवैध रेतीसाठा, एक जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर रेतीसाठा उमेश पुरुषोत्तम बोडेकर व दिनेश पुरुषोत्तम बोडेकर यांच्या मालकीच्या शेतात आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी सदर जप्त करण्यात आलेल्या अवैध रेती साठ्याचा लिलाव वरोरा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या दालनात करण्यात आला. सदर लिलाव प्रक्रियेत एकूण सहा लोकांनी सहभाग घेतला. सदर लिलावाची अपसेट प्राईस 32 लक्ष 76 हजार 189 रुपये ठेवण्यात आली होती. त्यापैकी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील सचिन ढोरे यांनी रुपये 60 लक्ष रुपयांची सर्वोच्च बोली लावल्याने सदर रेतीसाठा सचिन ढोरे यांना देण्यात आला. त्यामुळे 60 लक्ष रुपये एवढा महसूल शासनास प्राप्त झाला. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी पार पाडली.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंचायत समिती सभापती यांनी ताला ठोको चा इशारा देताच अखेर राजाराम मध्ये नाली सफ़ाईस सुरुवात

 

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत

 

गेवरा(खुर्द)परिसरातील नरभक्षक वाघास जेरबंद करा ! खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.