Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध सागवान तस्करी करणाऱ्या बारा आरोपींना वनविभागाने घेतले ताब्यात !

सागवान तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०१ फेब्रुवारी : आलापल्ली वनविभागात असलेल्या आलापल्ली नियतक्षेत्र झिमेला-II कक्ष ५४  राखीव वनक्षेत्रात  दि,
३१ /०१ /२०२२  रोजी अवैध सागवान वृक्षाची तस्करी करताना १२ आरोपी,सहा बैल गाडी ,१२ बैल( जनावरे ) ताब्यात घेण्यात वन विभागाला मोठे यश आले असून तस्करी करणार्याचे धाबे दनाणले आहेत .

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अल्लापल्ली वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरकर यांच्या मार्गदर्शनात वन पथकाद्वारे जंगलात गस्त  करीत असताना झीमेला ५४ कक्षामध्ये अवैधरीत्या सागवन वृक्षांची तोड करीत असल्याचे समोर आले .लगेच गस्ती पथकातील वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने घटनास्थळ गाठून १२  इसमांसह,सहा बैल गाडी ,१२ बैल (जनावरे) ताब्यात घेण्यात आले.

यावेळी अवैध सागवान वृक्षाची तोड करणार्या १२ हि  आरोपींना ताब्यात घेत  वन गुन्हा नोंद केला असून यामध्ये सर्व आरोपी
रा . रायगट्टा पो. राजाराम , तालुका अहेरी या एकाच गावातील आहेत तर   मोक्यावर २.०१५ घ.मी. वनउपज तसेच ६  बैलगाडी व १२  बैल जप्त करण्यात आले आहे. त्याची अंदाजीत किंमत ८५0000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर वनगुन्हयात सहभागी आरोपी १) नारायण  मलय्या चिरकेला वय- ५०   , २)  राजन्ना पोचम जाकेवार वय – ५८ ,  ३)  सुरेश दुर्गय्या आलमवार (२६) ,

४ )  समय्या लचमय्या निलमवार वय – ५० ,  ५ )संतोष  नागुजी मोहुर्ले  ६)  नागेश व्यंकटी चिंतावार  – ६० ७) श्री श्रीकांत राजन्ना निलमवार वय – २५  ,

८ ) श्री बापु गटु आलम वय – ५०  ९ ) श्री संतोष सत्यम गादे  – ३५,  १० ) मोहन शंकर कोलावार वय-२५ , ११) श तिरुपती भिमय्या चिंतावार वय – ४०  १२) नरेश व्यंकटी निलमवार  २४  या  सर्व  आरोपी  विरोधात भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१ )(ड), २६ (१ )(ई), २६ (1)(फ), ४२ (२) नुसार वनगुन्हा क्रमांक ०१/२०२२  दि,३१ /०१ /२०२२ वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदर वनगुन्हयांचा  तपास गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक  राहुलसिंह टोलीया, आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी,  नितेश  देवगडे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी  योगेश शेरेकर करीत आहेत. तर या कार्यवाहीसाठी अधिक मदत  वनपाल , मोहन भोयर,  अनिल झाडे,  ऋषी तावाडे,  प्रकाश राजुरकर नियत वनरक्षक  बाळु मडावी,  चंदु सडमेक,  तुषार मडावी,  संतोष चव्हाण, सचिन जांभुळे, अविनाश कोडापे, श्री दामोधर चिव्हाणे,  दशरथ राठोड,  बंडी अलोने, वाहन चालक विक्री कोडापे,  सचिन डांगरे वनमजुर शंकर ओडपल्लीवार मजुर श्री नानाजी मडावी, श्री संदिप भोयर श्री व्यंकटी  सडमेक सहकार्य  करीत आहेत .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.