Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘या’ शहरात विधवा स्त्रियांनाही हळदी कुंकवाचा मान

दिशा महिला मंचचा कौतुकास्पद उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़. परंतु, पनवेलमधील कामोठे येथील ‘दिशा महिला मंच’ च्या महिलांनी सालाबादप्रमाणे यंदाही ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या हळदी- कुंकू कार्यक्रमाची सुरुवात विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय दिशा महिला मंचने सुरु केला आहे. पूर्वापार चालत आलेल्या रुढीला बगल देत सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा, ही सद्भावना समोर ठेऊन हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दिशा महिला मंचच्या महिलांचे परिसरात कौतुक होत आहे.

पनवेल, दि. ३१ जानेवारी : दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू समारंभ ‘ती’ च्या नजरेतून या उपक्रमाचे आयोजन पनवेल परिसरातील कामोठे वसाहत येथील नालंदा बुद्धविहार या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकू समारंभाची सुरुवात विधवा महिलांना हळदीकुंकूचा मान देऊन करण्यात आला. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा या भावनेतून आयोजन करण्यात आले. जर तिच्या हाताने केलेला नैवेद्य देवाला चालतो तर आपण हा भेदभाव का करावा? हीच भावना ठेऊन हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी बचत गट व्यवसायावर मार्गदर्शन केले, आयुर्वेदाचार्य डॉ.नितीन थोरात यांनी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केस व केसांचे विकार आणि आयुर्वेद चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन केले तर लेखक व गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांनी पैशाची बचत कशी करावी व त्याचे योग्य ठिकाणी व्यवस्थापन कसे करावे यावर महिलांना मार्गदर्शन केले. उत्स्फूर्त अशा प्रतिसादात हा उपक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे संचालन विद्या मोहिते यांनी तर आभार खुशी सावर्डेकर यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा ठाकूर, भावना सरदेसाई, अनुप्रिता महाले, शिल्पा चौधरी, भक्ती शिंदे,योजना दिवटे, दीपाली खरात, रूपा जाधव, लीना सावंत, रुपाली होडगे यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स झाले सैराट

पोलीस उपनिरीक्षकांचा इमारतीवरून पडून मृत्यू

आत्महत्या करायला जातेय, चेहरा बघून घ्या! वडिलांना कॉल करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी

 

 

Comments are closed.