Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस उपनिरीक्षकांचा इमारतीवरून पडून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

उस्मानाबाद दी,31 जानेवारी : तुळजापूर येथे इमारतीवरून पडून पोलिस उपनिरीक्षक अनिल गंगाधर किरवाडे यांचा मृत्यू झालाय तर याच घटनेत पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुर्यवंशी हे गंभीर जखमी झालेत. तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवरील राज पॅलेस येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. किरवाडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असून जखमी कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या कमरेला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांत शोककळा पसरली असून घटनेचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

आत्महत्या करायला जातेय, चेहरा बघून घ्या! वडिलांना कॉल करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.