Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स झाले सैराट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. केवळ ५ फूट दुरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचे वायरल व्हिडिओतुन स्पष्ट झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत.  जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांच्या उत्तम व्हिडीओ-फोटो साठी वन्यजीवविषयक मुलभूत नियमांची पायमल्ली हौशी फोटो-व्हिडिओग्राफर्स करत आहेत. वाघांच्या या पॅपेराझिना शोधून वनविभागाने त्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यातील अनेक भागात वाघ रस्त्यावर सहजपणे दिसल्याच्या घटना घडतात. मात्र ग्रामस्थाना वाघाचे वर्तन ठाऊक असल्याने ते शिस्तीत आपला मार्ग निवडतात. मात्र ताज्या वायरल व्हिडिओत दिसलेली वाघांचा माग काढत त्यांचे फोटो-व्हिडीओ घेण्याची क्रेझ जीवावर बेतू शकते.

हे देखील वाचा : 

आत्महत्या करायला जातेय, चेहरा बघून घ्या! वडिलांना कॉल करून मॉडेलची सहाव्या मजल्यावरून उडी

पोलीस उपनिरीक्षकांचा इमारतीवरून पडून मृत्यू

 

Comments are closed.