Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भोंदू बाबाने बविआच्या नेत्याला घातला गंडा

एकमुखी रुद्राक्षा देण्याच्या नावाखाली नरेंद्र पाटील यांना १६ लाखांना फसवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, दि. ३ फेब्रुवारी :  वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र पाटील यांना २०२० मध्ये एका भोंदू बाबाने संपर्क केला.  माझ्याकडे एकमुखी रुद्राक्ष असून तो जवळ बाळगला तर भरभराट होईल असे सांगितले. हा एकमुखी रुद्राक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील असून त्यांची भरभराट झाली असे त्यांनी पाटील यांना सांगितले.

पाटील यांचा त्यावर विश्वास बसला आणि त्यांनी या भोंदू बाबाला रुद्राक्षासाठी एक वर्षाच्या कालावधीत तब्बल १६ लाख रुपये दिले. मात्र तरी देखील त्यांना एकमुखी रुद्राक्ष मिळाला नाही. भोंदू बाबा आणि त्याच्या दोन्ही सहकार्‍यांनी आपले फोन बंद करून टाकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी वसई पोलीस ठाणे गाठले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वसई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे यांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली. चकाचक भोसले उर्फ अजित पावरा आणि जोगनाथ नाथ अशी या दोन आरोपींची नावे आहेत. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आम्ही त्याला लवकरच अटक करू असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.