Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खड्डा चुकविण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक

एक जागीच ठार तर दोन जखमी.... नंदीगाव येथिल घटना...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १४ मार्च  :  आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव येथे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले आहेत.

आलापल्ली -सिरोंचा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. या मार्गावर खड्ड्या मूळे अनेक अपघात झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अपघातात सुनील गंगा सोयाम (३२) हा व्यक्ती जागीच ठार झाला. तर गंभीर् जखमी मध्ये कमलेश हणमंत सडमेक (३५) रा. झिमेला व रमेश कैसा सोयाम (४६) रा. राजाराम यांचा समावेश आहे.

आज संध्याकाळी रायगट्टा येथून शाळा आटोपून आलापल्ली कडे परत जात होते व सुनील आणि कमलेश हे दोघे मनेराजाराम येथून नवस कार्यक्रमात जाऊन परत निमलगुडम ह्या आपल्या स्वगावी येत असताना नंदीगाव जवळ खड्डा चुकवण्याचा नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अपघातातील गंभीर जखमीना त्वरित उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलवण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह…

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य आदिवासी सामुहीक विवाह सोहळा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.