Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस आणि नक्षलमध्ये उडाली चकमक; चकमकीत एक पोलीस जवान जखमी

भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरातील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली पोलीस विभागाने दोन वर्ष्यात नक्षल्यांना सळो कि पळो करून सोडले आहे. यात नक्षल्याच्या मोठमोठे नक्षल नेत्यांचा खात्मा केला असल्याने नक्षल चळवळ पोकळी झाली आहे. दरम्यान समोर तेंदूपत्ता हंगाम सुरू होत असल्याने ग्रामीण भागात  दहशत निर्माण केली तर समोर होणाऱ्या तेंदूपत्ता  हँगामात कंत्राटदारावर वचक निर्माण होईल आणि मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा असल्याने वेळोवेळी अतिदुर्गम भागात नक्षल दहशत  निर्माण करीत असतात. तर परिणामी खबऱ्या म्हणून काही लोकांना ठार केले असल्याने नागरिकात दहशत आधीच असते याचाच फायदा घेत तेंदूपत्ता हंगामात नक्षल  हिंसक कारवाया करुण सक्रिय राहण्याचा प्रयत्न असतो. असे अनेक जाणकाराचे मत प्रकट होताना दिसून येते.

गडचिरोली, दि. ३ मे :  भामरागड तालुक्यातील धोडराज जंगल परिसरात नक्षल असल्याची गोपनीय माहिती पोलिस विभागाला  प्राप्त होताच नक्षल विरोधी अभियान राबविन्यात आले. दरम्यान   जंगलात नक्षल्याना पोलिस जवान दिसताच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधून गोळीबार सुरु केला. क्षणाचाही विलंब न करता पोलीस जवानांनी नक्षल्यांना जशास तसे प्रतिउत्तर दिले. या चाललेल्या धुमश्चक्री चकमक जवळपास एक ते दीड तास सुरु होती अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाल्याने ” त्या” जखमी पोलिस जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले असले तरी जखमी पोलिस जवानाचे नाव कळू शकले नाही.

घटनास्थळी चकमक सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलिसांनी शोध मोहिम अधिक तीव्र केली आहे .. दरम्यान झालेल्या चकमकित काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनास्थळी नक्षल्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलीस जवानाना यश आल्याचे सूत्राकड़ूंन माहिती प्राप्त झाली आहे . तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्चींग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

Comments are closed.