Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मध्य रेल्वे वर २१,२२ व २७,२८ रोजी प्रत्येकी ३ ते ४ तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २१ नोव्हे :- कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ – कल्याण रस्त्यावरील वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात असून. या पुलाच्या लौंचिंग प्रक्रियेकरिता 21 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी दोन दिवस प्रत्येकी 4 तासांचा मेगाब्लॉक मिळावा यासाठी मागील आठवड्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाठवपुरावा केला होता. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी 4 तास असा एकूण 8 तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी 3 तास असा 6 तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

परंतु, या कामा दरम्यान 250 लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीसाठी आज बैठकीत घेण्यात आली. समस्या सोडवण्यासाठी पर्यायी वाहतूक उपाययोजना , त्याचबरोबर गर्डर लौंचिंगचे काम सुरक्षितपणे करण्यासाठी आज रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे रिझर्व्ह फोर्स, स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्यासहित संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.