Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॉमेडियन भारती सिंहला अटक,गांजा घेत असल्याची कबुली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आता कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरु आहे. कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  भारतीला अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दोघांना NCB ने आधी  समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.

एनसीबीने आज खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष-भारतीच्या घरावर छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.