Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डाशी संलग्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

25 जुलै :-  मतदार याद्यांचे प्रमाणीकरण , दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले . आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र . ६ ब भरायचा आहे . सदर अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये , भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ ( https://eci.gov.in/ ) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ ( https://ceo.maharashtra.gov.in/ ) येथे उपलब्ध असेल . तसेच National Voter Service Portal या संकेतस्थळावर Voter Helpline APP वरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड संलग्न करून स्व – प्रमाणित करता येईल . हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल . मात्र याप्रकारे संलग्नीकरण शक्य झाले नाही किंवा स्व – प्रमाणित करावयाचे नसल्यास , तर केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करून स्व – प्रमाणित न करता मतदाराला स्वतःच्या मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करता येईल तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र . ६ ब भरून घेतील आणि त्यांचे संगणकीकरण केले जाईल.

या मोहिमे अंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून राज्यव्यापी विशेष शिविरांचे आयोजनही केले जाणार आहे . मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्या संलग्नीकरणामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण मतदारांच्या एकापेक्षा अधिक नोंदींची वगळणी , निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करणे , हे उद्देश साध्य होणार आहेत . आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे . आधार क्रमांक सादर करता आला नाही या निकषावर मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव वगळले जाणार नाही . तसेच आधार क्रमांक नमूद केलेले प्रत्यक्ष आणि संगणककृत दस्तावेज दुहेरी कुलूपबंद ठेवले जातील आणि आधार क्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी आधार कार्डावरील क्रमांक लपविण्याची ( Masking ) तरतूद केली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

Comments are closed.