Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन विभागाचा गुरवळा येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत स्तुत्य उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 25 जुलै :-  गडचिरोली येथील गुरवळा गावात वन विभागाच्या सामाजिक वनिकरण आणि गुरवळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “कन्या वन समृद्धी” योजनेअंतर्गत रोपे वाटपाचा अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला. “कन्या वन समृद्धी” योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मागील वर्षात मुलगी जन्माला आली आहे अशा कुटूंबाला शासनामार्फत फळझाडे, बांबू, साग व इतर प्रजातिच्या अशा १० रोपांचे वाटप केले जाते. भविष्यात या झाडांपासून मिळणारे उत्पन्न हे त्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी उपयोगी होतील या उदात्त हेतने ही योजना राबवली जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. सोनल भडके हे उपस्थित होते, तसेच गुरवळा गावच्या सरपंच सौ. दर्शना भोपये यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागरिकांना वृक्ष लगडीचे महत्व पटावे, तसेच वृक्ष लागवडीतून उत्पन्न मिळवून, या माध्यमातून निसर्ग संवर्धन व्हावे यासाठी वन विभागाकडून नवनवीन योजना राबविल्या जातात. सामाजिक वनिकरन विभागामार्फत देखील दरवर्षी “कन्या वन समृद्धी” योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मागील वर्षात मुलगी जन्माला आली आहे अशा कुटूंबाला शासनामार्फत फळझाडे, बांबू, साग व इतर प्रजातिच्या अशा १० रोपांचे वाटप केले जाते. भविष्यात या झाडांपासून मिळणारे उत्पन्न त्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी उपयोगी येईल हा उदात्त हेतू या योजनेचा आहे.

आज दिनांक २५ जुलै २०२२ रोजी गुरवळा संयुक्त समिती मार्फत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावात मगील एका वर्षात ज्या मुली जन्माला आल्या त्यांच्या नावे त्या कुटुंबाला प्रत्येकी १० रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी
“गुरवळा संयुक्त समिती गावचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे” प्रतिपादन सहाय्यक वनसंरक्षक श्री. सोनल भडके यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमासाठी गुरवळा ग्रामपंचायतचे उपसरपंच, श्री. प्रकाश बांबोळे, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री. निलकंठ गेडाम तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. चंद्रकांत भोयर व विलास अडेंगवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि योजनेविषयी मार्गदर्शन गडचिरोली सामाजिक वनिकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री. धीरज ढेंबरे यांनी केले. तर, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल श्री. निलकंठ वासेकर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच सामाजिक वनिकरन परीक्षेत्र गडचिरोलीच्या वनपाल कु. विद्या उइके, व वनरक्षक कु. मेश्राम मॅडम तसेच अमित भुरले, जनार्दन तुंकलवार हे देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता वनरक्षक कु. शितल खुळसंगे, यांनी उपस्थितांचे तसेच ग्रामपंचायत गुरवळा तसेच, लाभार्थ्यांचे आभार मानून केली.

हे देखील वाचा :-

घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

घाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….

Comments are closed.