Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 27 जुलै :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे.निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली त्यांना स्थगिती दिली. अत्यावश्यक कामांना स्थगिती नाही. सरकार बदललं म्हणून लोकविकासाची काम कुठलीही रद्द होणार नाहीत. अत्यावश्यक जी कामं आहेत ती रद्द होणार नाहीत, चुकीच्या पद्धतीनं जी कामं झाली त्यावर मात्र नक्की विचार केला जाईल. घाईघाईने केलेली काम आहेत त्यांना स्थगिती दिली आहे.  अधिकाऱ्यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.