Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हास्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 4 ऑगस्ट :-  क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने तसेच जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नामेंट सोसायटी, नवी दिल्ली द्वारा 2022-23 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी (सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले/मुली) या क्रीडा र्स्प्धांचा कार्यक्रम संचालनालय, पुणे यांना प्राप्त आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरीता सबज्यूनिअर (15 वर्षाच्याआतील मुले) क्रीडा स्पर्धा मुले वयोगट करीता दि. 01 नोव्हेंबर, 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली वयोगट करीता दि. 01 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय नेहरु कप हॉकी (सबज्युनिअर / ज्युनिअर) क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ऑफलाईन नोंदणी दि. 07 ऑगस्ट, 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मदाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) असणे अनिवार्य आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पर्धा आयोजन : 15 वर्षाआतील मुले (सबज्युनिअर) दि. 08 ते 09 ऑगष्ट, 2022, 17 वर्षाआतील मुले (ज्युनिअर) दिनांक 8 ते 9 ऑगस्ट,2022, 17 वर्षाआतील मुली (ज्युनिअर) दिनांक 8 ते 9 ऑगस्ट,2022, स्पर्धा उपस्थिती:- स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9 .00 वाजता (सर्व वयोगट)
स्पर्धा स्थळ:  तालुका क्रीडा संकुल, आरमोरी. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नांव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नांव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख / मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने पाठवावा. तसेच स्पर्धेकरीता आवश्यक किट सोबत आणणे आवश्यक आहे.
तरी गडचिरोली जिल्ह्यातील शाळा / संघांनी नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धात जास्तीत जास्त संघांनी / शाळांनी सहभागी व्हावे, व अधिक माहितीसाठी श्री. एस.बी. बडकेलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांचेशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संजय राऊतांच्या इडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ.

Comments are closed.