Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राऊतांच्या इडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ.

संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई प्रतिनिधी 4 ऑगस्ट :-  पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी इडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांची इडी कोठडी ८ ऑगस्ट पर्यंत वाढली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडीच्या कोठडीतील मुक्काम आणखी चार दिवस वाढला आहे. दरम्यान आज राऊत यांना कोर्टात हजर करते वेळी त्यांचे ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना यांची आज किडीची गोठडी संपणार होती त्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात आणले जात असताना त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली. एडी कार्यालयातून निघत असताना बाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत आणि इतर नातेवाईक किडीच्या कार्यालया बाहेर होते त्यांच्याशी संजय राऊत बोलत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटकले त्यावेळी संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली त्यानंतर संजय राऊत पोलिसांच्या गाडीच्या दिशेने गेले, मात्र गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी फुटबोर्डवर उभे राहत हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. मात्र त्यावेळी देखील अधिकाऱ्यांनी त्यांना तसे करण्यास मनाई करण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज संजय राऊत यांना कोर्टात न्यायाधीशांनी विचारणा केली की इडीच्या कोठडीमध्ये तुम्हाला काही त्रास आहे का ? त्यावर संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची न्यायाधीशांना तक्रार केली. मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे त्या खोलीत व्हेंटिलेशन नाही मला हृदयाचा त्रास असल्यामुळे अशा खोलीमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे राऊत यांनी न्यायाधीशांना सांगितले. त्यावेळी न्यायाधीशांनी इढीच्या अधिकाऱ्यांना सुनावत तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर उत्तर देताना ईडीने कोर्टाची माफी मागत संजय राऊतांना ज्या ठिकाणी ठेवलं आहे तिथे एसीची व्यवस्था केलेली आहे. तसेच आम्ही राऊतांना व्हेंटिलेशन असलेली खोली देण्यास तयार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराने घेतला जीव…

Comments are closed.