Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नितीश कुमार 22 वर्षात 8 व्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, दुपारी 2 वाजता होणार शपथविधी कार्यक्रम..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पाटणा, 10,ऑगस्ट :-  बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. येथील सत्तेत असलेल्या जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांची युती आता तुटली आहे. आता नितीशकुमार तेजस्वीसोबत सरकार स्थापन करणार आहेत.
जेडीयू नेते नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी 2 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. द्विसदस्यीय मंत्रिमंडळात नंतर आणखी मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सोडून कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते सात पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. या आघाडीला अपक्षांचा पाठिंबा असणार आहे.
नवीन मंत्रिमंडळात जेडीयू व्यतिरिक्त आरजेडी आणि काँग्रेसचे प्रतिनिधी असतील. नवीन सरकारची स्वतंत्र ओळख टिकवण्यासाठी डावे पक्ष बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
ब्यूरो रिपोर्ट लोकस्पर्श न्यूज, पटणा.

१) नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आज अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.
२) आज दुपारी 2 वाजता राजभवनात होणार शपथविधी कार्यक्रम.
३)नितीशकुमार यावेळी सात पक्षांच्या आघाडीचे करणार नेतृत्व करणार.
४) काँग्रेसलाही मंत्रिमंडळात असणार स्थान.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

राज्यस्तरीय रशियन आर्मी स्पोर्ट हॅन्ड टू हॅन्ड स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे खेळाडू चमकले

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.