Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाचनातून समाज जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास होतो– निवासी उपजिल्हाधिकारी, शेंडगे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.10 :-  

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दिनाच्या निमीत्ताने आदिवासी साहित्य आणि थोर क्रांतीकारकांच्या जीवन चरीत्राच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी समाधान शेंडगे म्हणाले की, वाचनातून आपल्याला समाज जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास होतो. आपला इतिहास, संस्कृती सोबतच आपली कर्तव्ये यांची जाणीवही वाचनातून होते. देशासाठी बलीदान देणाऱ्या महापुरूषांपासून प्रेरणा घेउन राष्ट्र कल्याणासाठी आपण झटले पाहिजे असे त्यांनी प्रतीपादन केले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ होते. ज्येष्ठ साहित्यीक बडोंपत बोढेकर, प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी र. वा. शेंडे यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. र. वा. शेंडे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक बंडोपंत बोढेकर म्हणाले की, मुळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे महान काम केले आहे. उत्क्रांतीचे विविध टप्पे सांभाळून त्यांनी आपली बोली टिकवून ठेवली. या बोली भाषेत पूर्वजांच्या अनेक पिढयांचा समृध्द वारसा असलयाने तो ग्रंथ रूपाने पूढे यायला हवा. बोली भाषेच्या अभ्यसकांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन अडसूळ म्हणाले विकास म्हणेजे नक्की काय यावर प्रत्येकानी चितंन करावे म्हणजे आपले देशाप्रती आपले कर्तव्य काय असू शकते हे लक्षात येईल. गडचिरोली जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. याच अमुल्य निसर्गातील भौगोलीक परिस्थितीमूळे विकासाला अडचणी निर्माण होत आहेत. परंतू आता आरोग्य सुविधा व शिक्षणाच्या सुविधा दुर्गम भागात पोहचल्या आहेत. आदिवसी दिन साजरा करीत असताना आपण जिल्हयात उपलब्ध सुविधांचा सदुपयोग करून आपले शिक्षणातून आपले स्थान निर्माण केले तर जिल्हयाची नवी ओळख निर्माण करण्यात आपला सहभाग स्पष्ट दिसून येईल असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते. सुत्र संचालन लकेंश मारगाये यांनी केले. तर आभार प्रदर्शन निखील पोगले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयीतील सुर्यकांत शं. भोसले व शिवाजी ग्रंथालयातील रवि समर्थ आणि विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले. ग्रंथप्रदर्शन 12 ऑगसट पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे तरी वाचक वृंद व ग्रंथप्रेमी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी र. वा. शेंडे यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

राष्ट्रकुल स्पर्धेचा रंगतदार समारोप! ६१ पदकांवर कोरलं भारताने नाव.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.