Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने सप्तरंगी ध्वजारोहण.

माजी आ. दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 10 ऑगस्ट:-  ९ ऑगस्ट हा दिवस आपण ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करतो. यंदा सर्वच ठिकाणी अगदी उत्साहात हा आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य मिरवणुका देखील काढण्यात आल्या. यातच अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त गोटूल भूमी येथील समाज मंदिराच्या पटांगणात सप्तरंगी ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाची विधिवत पूजा करून दिपकदादा आत्राम,माजी आमदार याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोठया संख्येने नागरिकांनीही या ध्वजारोहणाला उपस्थिती दर्शवली. अनेक ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषेतही पाहायला मिळाले.

यावेळी मेडपल्ली येथील सरपंच श्री निलेश वेलादी,भगवान मडावी,नामदेव तोरेम, मारोती पेंदाम,बाबुराव वेलादी, लक्ष्मण तलांडे, जोगा तलांडे,विजय कुसनाके माजी सरपंच, दिलीप गंजीवार माजी सरपंच, संदीप बडगे सह समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

गडचिरोलीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.