Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 11 ऑगस्ट :-  सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान गौरव करण्यासाठी सुरू केलेली योजना दिनांक 31 जुलै 2020 रोजी बंद करण्यात आली होती. ती योजना सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाने दिनांक 14 जुलै 2022 रोजी च्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे . आणिबाणीच्या लढयामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी दिनांक 03 जूलै ,2018 च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे निर्देशित केले आहे.

तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 असा राहील त्यामुळे नवीन अर्ज या दिनांकापर्यत सादर करण्याची दक्षता अर्जदारांनी घावी असे निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन

 

Comments are closed.