Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर 11 ऑगस्ट :-  चंद्रपुर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील दुहेरी संकटात सापडलेल्या आर्वी गावाला एका बाजूला महापुराने वेधले असून, दुसरीकडे तापाच्या साथीने गावात थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गावात तापाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या गावात अखेर दोन डॉक्टर देवदूत म्हणून अवतरले आहेत. डॉ.आशीष आसुटकर आणि डॉ.अभिषेक साठे यांनी भर पुरातून डोंग्यांनी गाव गाठले आणि रूग्णांवर उपचार सूरू केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावाला पुराचा वेढा पडल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात तापाची साथ उद्भवल्यामुळे लहान मुले तापाने फणफणत आहेत तर प्रौढांनाही तापाने घेरलं आहे. उपचारासाठी काही आई-वडील थेट जंगलातून वाट काढीत आहेत. रोज रुग्णांची संख्या वाढत असल्याने थेट ट्रक्टरने जंगलातून मार्ग काढून रूग्णांना उपचारासाठी हलविले जात आहे.  मात्र गावावर ओढावलेल्या संकटात प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगावचे वैद्यकीय अधिकारी आशीष आसुटकर आणि अभिषेक साठे या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भर पुरातून वाट काढत डोग्यांनी (होडी) या गाव गाठले. या दोन्ही डॉक्टरांनी रुग्णांवर गावातच उपचार सूरू केले आहेत. त्यामुळे गावात देवदूतच अवतरल्याची भावना गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

 

Comments are closed.