Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आवळगांव शेत शिवारात वीज पडून एक महिला जागीच ठार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रह्मपुरी 11 सप्टेंबर :-  ब्रह्मपुरी पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श आवळगाव येथे श्री नथ्थुजी नरुले यांची सून अश्विनी सुधीर नरुले ही गावातील नऊ, दहा शेतमजूर महिला घेऊन शेतावर धानातील निंदन काढत होत्या. गावातील रूढी परंपरेनुसार दुपारी २-०० वाजे दरम्यान सर्व महिला जेवणाकरिता शेतातील धुर्‍यावर असलेल्या सागाच्या झाडाखाली जेवणासाठी बसल्या होत्या. तेवढ्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि अचानक ज्या सागाच्या झाडाखाली घरून आणलेले डबे जेवण करीत होत्या त्याच झाडावरती वीज कोसळली आणि श्यामल वासुदेव लोळे वय 47 वर्ष ही सागाच्या झाडाला टेकून बसलेली शेतमजूर महिला जागीच ठार झाली तर ज्योती निलेश पोहनकर वय २६ वर्ष ही शेतमजूर महिला गंभीर जखमी झाली. अश्विनी सुधीर नरुले ही शेतमालकिन सुद्धा किरकोळ जखमी झाली. या घटनेत काही महिलांवर विजेचा परिणाम त्यांच्या कानावरती झाला असून कानाला स्पष्ट ऐकू येत नाही असे बोलल्या जात आहे.

सदर घटना ही आवळगाव पासून एक किलोमीटर अंतरावर गुरुबाबा देवस्थान रोड वरती घडली आहे. सदर घटनेची माहिती मेंडकी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी महिलांना आरमोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणि मृत महिलेला शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले. सदर घटनेमुळे संपूर्ण गावा वरती शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.