Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ आयोजित रक्तदान शिबीरला तरुणांचा भरघोस प्रतिसाद

महिला रक्तदात्यांचा लक्षणीय सहभाग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. ११ सप्टेंबर : सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाच्या वतीने आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. नागझरी आणि नावझे येथे एकूण २०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आजच्या या रक्तदान शिबिरासाठी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे कुणबी समाजातील तरुणांमध्ये असलेली संवेदनशीलता आणि सहकार्याची भावना दिसून आली. तसेच यावेळी महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. याबद्दल सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाकडून सर्व रक्तदात्यांचा सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पुर्व विभागाकडून आज नागझरी येथील स्व. नामदेव भाऊ पाटील सभागृ आणि नावझे गावातील जुनी मराठी शाळा येथील उपकेंद्र या दोन ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी तब्बल २०८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे यावेळी महिला रक्त दात्यांचा देखील मोठा सहभाग होता. त्यामुळे मंडळाच्या वतीने सर्व रक्त दात्यांचे, तसेच शिबिराच्या आजोजनात मोलाची जबाबदारी पार पाडणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नावझे यांचा सन्मान करण्यात आला आणि सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) युवक मंडळाकडून रक्तदान, आरोग्य शिबिर, क्रीडा – सांस्कृतिक स्पर्धा किंवा इतर समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात नेहमीच आघाडीवर असते. तसेच, मंडळाच्या वेगवेगळ्या उपक्रमांना समाज बांधव देखील नेहमी चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे या मंडळाची संपूर्ण पालघर जिल्ह्यात एक आदर्श समाज मंडळ म्हणून ख्याती आहे.

आजच्या या रक्तदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाचे अध्यक्ष महेंद्र केशव सोगले होते, तर, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नागझरी येथील आशुतोष सुदाम अधिकारी आणि नावझे येथील प्रमोद जगन्नाथ भोईर हे लाभले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नावझे गावचे रहिवासी सचिन पांडुरंग पाटील आणि किराट येथील रोशन प्रकाश गायकवा हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य श्री कमलाकर अधिकारी यांनी विज पुरवठ्याबाबत सहकार्य केले. तसेच मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ विनया विकास पाटील यांनी रक्तदान शिबिरादरम्यान उपस्थित राहून रक्त दात्याना प्रोत्साहन दिले.

हे देखील वाचा :

आवळगांव शेत शिवारात वीज पडून एक महिला जागीच ठार

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन.

Comments are closed.