Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीतरंग चक्रीवादळामुळे 4 राज्यांना रेड अर्लट

महाराष्ट्राच्या या भागावर होणार परिणाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  25, ऑक्टोबर :-  ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात सीतरंग नावचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने जोरदार वार्यासह मुसळधार पावसाच शक्यता आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकेल. त्यामुळे 4 राज्यांना रेड अर्लट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टयामुळे चक्रीवादळ निर्माण झाले. रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित होउन बांगलादेश किनारपट्टीकडे सरकल्याची माहिती होती. त्यामुळे ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सीतरंग चक्रीवादळ भारतात कमकुवत झाले असले तरी अनेक राज्यांमध्ये अर्लट कायम आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी ओडीशा, बंगाल, मिझोरामसह अनेक भागात अतिवृष्टी चा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागात याचा परिणाम पहायला मिळू शकतो. कोकण, कर्नाटक, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे बांग्लादेशमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला. सीतरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नेऋत्य किनारपट्टीवर धडकले. त्याचा परिणाम भारतातील अनेक राज्यांवर झाल्याचे दिसतेय. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

शाहरूख खानच्या ‘पठाण’ चा दमदार टीझर प्रदर्शित

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशिल

Comments are closed.