Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का !

फॉरमॅट मध्ये नसल्याने उद्धव ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निकामी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

दिल्ली  26 ऑक्टोबर :-  ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ११ लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करत आघाडी घेतली आहे. मात्र, ठाकरेंच्या  गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील ८.५ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश आलं आहे. खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या  गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.

शिवाय आपली शिवसेना हीच खरी सेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही कागदपत्र आता जमा करुन देखील निरोपयोगी ठरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.