उद्या ठरणार बहुचर्चित ‘डबल XL’, ‘मिली’ आणि ‘फोन भूत’ च भविष्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 03 नोव्हेंबर :- उद्या शुक्रवारी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘डबल XL’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो याकडे सर्वांची नजर आहे. मात्र, याच दिवशी कतरिना कैफचा ‘फोन भूत’ आणि जान्हवी कपूर चा ‘मिली’ हे दोन चित्रपट पर रिलीज होत आहे. आता या तिन्ही चित्रपटांपैकी बाॅक्स ऑफिसवर कोणता चित्रपट हिट होणार हे उद्या कळेल.
सोनाक्षी सिन्हाचा ‘डबल XL’ चित्रपट वजन वाढल्यानंतर विशेषत मुलींना किती समस्यांना सामोरे जावे लागते यावार आधारित आहे. काही दिवसांपासून वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनत आहे. यावर हा चित्रपट आहे. हुमा आणि सोनाक्षीची जबरदस्त काॅमेडी या चित्रपटात बघायला मिळेल. इतकेच नाही तर सोनाक्षी आणि हुमाने या चित्रपटासाठी तब्बल 20 किलो वजन वाढवले होते.
कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटात ईशान खट्टर, सिध्दांत चतुर्वेदी महत्वाच्या भूमिकेत आहेत. कतरिना या चित्रपटात एका भूताच्या भुमिकेत आहे. जान्हवी कपूरच्या ‘मिली’ हा चित्रपट मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर ने दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटात जान्हवी सोगत सनी कौशल आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.