Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर 4 रन्सनी विजय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 04 नोव्हेंबर :- ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये आज सुपर 12 राडंड मधील सामना झाला. अफगाणिस्तानचे टी-20 वर्ल्डकप मधील आव्हान आधीच संपुष्टात आला आहे. मात्र, सेमीफायनलमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पर 4 रन्स नी विजय मिळवला आहे.

आज झालेल्या अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, ऑस्ट्रेलिया ने हा सामना केवल 4 धावांनी जिंकला. राशिद खानच्या खेळाने सर्वांचेच मन जिंकले. राशिद खान ने या सामन्यात 23 चेंडूत नाबाद 48 धावा काढल्या. यात 3 चैकार आणि 4 षटकार होते. अफगाणिस्तानकडून राशिद ने सर्वांधिक नाबाद 48, गुलबदीन नईब ने 39, इब्राहिम झादरान ने 26 आणि गुरबाज ने 30 धावा काढल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अफगाणिस्तानला लास्ट ओव्हर मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. राशिद खान ने फटकेबाजी करून या ओव्हरमध्ये 18 धावा काढल्या. विजयासाठी केवल 4 धावा कमी पडल्या. ऑस्ट्रेलिया ने पहिले बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 168 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 32 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. मिचेल मार्श ने 45, डेविड वाॅर्नर ने 25 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 164 धावा केल्या.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.