Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

न्यूझीलंड ने 35 धावांनी केला आयर्लंडचा पराभव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 04 नोव्हेंबर :-  टी-20 विश्वचषक च्या सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड ने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव करत आपला सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. सुपर-13 च्या ग्रुप 1 मधुन सेमीफायनल पोचणारा न्यूझीलंड हा पहिला संघ आहे. आयर्लंडसोबत मिळालेल्या विजयामुळे न्यूझीलंड संघाचे 7 गुण झाले आहे.

आयर्लंडविरूध्द प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 185 धावा केल्या. प्रत्यूरत्तराम चांगली सुरूवात करूनही आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 150 धावा केल्या. आयर्लंडकडून पाॅल स्टर्लिंगने 37 धावा केल्या. कर्णधार बलबर्नी 30, जाॅर्ज डाॅकरेल ने 23 धावा केैल्या. न्यूझीलंडकडून लाॅकी ने 3 तर साउथी, सॅंटनर, सोधी ने 2-2 विकेट घेतल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फाॅर्ममध्ये परतलल्या केन विल्यमसन ने 35 चेंडूत 61 धावा केल्या. परंतु आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने या सामन्यात हॅट्रिक घेतली. विल्यमसन ने स्पर्धेत प्रथमच शंभरच्या स्टाईक रेटने फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चैकार आणि तीन षटकार मारले. सलामीवीर फिन एॅलनने 18 चेंडूत 32, ग्लेन फिलिप्स ने 9 चेंडूत 17 आणि डॅरिल मिशेल ने 21 चेंडूत नाबाद 31 धावा काढल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज लिटिलने डेथ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडची धावगती रोखली. 19 व्या षटकात त्याने सलग तीन चेंडूंवर विल्यमसन, जिमी नीशम आणि मिचेल सॅंटनर यांच्या विकेट घेतल्या.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.