Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘धारावी बॅंक’ या सिरीजचा टीझर रिलीज

सुनील शेट्टी-विवेक ओबेराॅय आमने-सामने

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 04 नोव्हेंबर :-  ‘धारावी बॅंक’ या सिरीजचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. यात अभिनेता सुनील शेट्टी आणि विवेक ओबेराॅयने आमने-सामने दमदार अभिनय केले आहे. मागचे अनेक दिवस या सिनेमाची चर्चा होती. आश्रम, भौकाल आणि रक्तांचल सारख्या वेब सिरीजनंजर एमएक्स प्लेअरवर ‘धारावी बॅंक’ ही नवी सिरीज पहायला मिळणार आहे. विवेक ओबेराॅय, सुनिल शेट्टी आणि सोनाली कुलकर्णी यात प्रमुख भुमिकेत आहेत.

एमएक्स प्लेअरवर होणार्या या सिरीलचा टीझर रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. धमाकेदार सीन ने ‘धारावी बॅंक’च्या टीझरची सुरूवात होते. सिरीजमध्ये सुनिल शेट्टी अन्ना ची भुमिका साकारणार आहेत. अन्ना हा साउथ इंडियन असून त्याच्या एरियात त्याची चलती पहावयास मिळते. टीझरमध्ये पहले अन्नाची एन्ट्री दाखविण्यात आली आहे. त्यानंतर बाईकवर खाकी वर्दीत विवेक ओबेराॅयची हटके एंट्री होते. संपूर्ण सिरीजमध्ये विवेक आणि सुनिल यांच्या काटेकी टक्कर पहावयास मिळणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘धारावी बॅंक’ या सिरीजची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. झी स्टुडिओने सिरीजची निर्मिती केली आहे तर सुमित कक्कड ने दिग्दर्शन केले आहे. सिरीजचा टीझर पाहून आता ट्रेलर आणि संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.