Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बार्टी संस्थेमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरीता अर्थसहाय्य.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. 27 नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरीता (UPSC) दर वर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020, दि.04 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली. व परीक्षेचा निकाल दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
या वर्षी सन 2020 मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी रक्कम रुपये 50,000/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
बार्टी मार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतकस्थळावर भेट देऊन पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करुन व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत असे आवाहन मा. महासंचालक धम्मज्योती गजभिये, बार्टी पुणे यांनी केले आहे. असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजेश एस. पांडे यांनी कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.