जिल्हा एड्स प्रतिबंधन व नियंत्रण पथकाच्यावतीने 01 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाईन मार्गदर्शन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. 27 नोव्हेंबर: 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन व जागतिक एड्स सप्ताह म्हणून पाळल्या जातो. एचआयव्ही बाधितांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे व तरुणाईला या आजारापासून दूर ठेवणे याकरीता या दिवसाचे महत्व आहे.
आज घडीला पूर्वीप्रमाणे आपण जागृती कार्यक्रम, सभा, रॅली काढू शकत नाही कारण कोरोना प्रसाराची दाट शक्यता असते म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून एचआयव्ही बाबत मार्गदर्शन व तरुणांना संदेश देता येईल याकरीता दि. 1 डिसेंबर ला सकळी 10.30 ते 11.30 वाजता https://webcastlive.co.in/worldaidsday2020/ या लिंकवरती विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यत: एचआयव्ही प्रसाराचे 4 प्रमुख मार्ग आहेत. 1) दुषीत सुई 2) दुषीत रक्त 3) असुरक्षित लैंगीक संबंध 4) गरोदर मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला. यात मातेपासून होणाऱ्या बाळाला ही गंभीर समस्या आहे. पण आजमितीस बाधितांची अपत्ये ही 100 टक्के सुरक्षित होवू शकतात. यासाठी गरज आहे ती शासनाचे नियम व औषधोपचार पद्धती पाळण्याची ती पुढील प्रमाणे आहेत. सर्वप्रथम तर गरोदर काळातच एचआयव्ही तपासणी करावी. बाधित असल्यास तात्काळ औषधोपचार सुरु केला जातो. बाळंतपण शासकीय रुग्णालयातच करावे, जन्मत: बाळाला औषधी दिली जाते, येथपासून तर बाळ 18 महिन्याचा होत पर्यंत बाळाचे क्रमबद्ध तपासणी 6 आठवडे, 6 महिने, 12 महिने व 18 महिन्यांपर्यंत सुरळीत औषधोपचार तसेच नियम पाळले तर बाधितांचे बाळ 100 टक्के एचआयव्ही पासून सुरक्षित राहतो.
शासन आरोग्य विभाग तर आपले कर्तव्य पार पाळतच राहील पण जनतेने सुद्धा आपला सहकार देणे गरजेचे आहे ते म्हणजे गरोदर पणाच्या तिसऱ्या महिन्यातच माता-पिता यांनी एचआयव्ही तपासणी करणे, एकपत्नीव्रत पाळणे, विवाहबाह्य संबंध टाळणे, तरुणांनी विवाहपुर्व संबंध टाळणे, टिबी आजार असल्यास एचआयव्ही तपासणी करावी, मैत्री निखळ करावी, एचआयव्ही बद्दल आयसीटीसी सेंटरला भेट देवून शासकीय माहिती जाणून घ्यावी. वरील नियम हेच सुखी संसाराचे व सूखी जिवनाचे मूलमंत्र आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मनोगत – नॅको ने या वर्षी दिलेल्या ब्रीदवाक्या प्रमाणे समाजाने वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी ओळखून वागावे, तरुणांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी आरोग्य सुरक्षित ठेवावे, कोरोना, एचआयव्ही, टि.बी. सारख्या आजारांविषयी विस्तृत शास्त्रीय माहिती जाणून घेवून जीवन सुरक्षित करावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Comments are closed.