Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदान केंद्राच्या परिसरात उद्यापासून जिल्हयात 1 डिसेंबर रात्रीपर्यंत 144 कलम लागू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. 28 नोव्हेंबर: भारत निवडणूक आयोग अन्वये नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाची द्वीवार्षिक निवडणूक-२०२० चा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार, नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाची निवडणूक मतदान दिनांक ०१ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. त्यामळे सर्व अधिसूचित मतदान केंद्राचे १०० मिटर परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची व निवडणूक भयमुक्त व शातंतापुर्ण वातावरणात पार पाडण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील अधिसूचित मतदान केंद्राचे १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

यामध्ये मतदान केंद्रात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती (निवडणूक संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत व इतर कोणतीही व्यक्ती हत्यार, आक्षेपार्ह किंवा प्रतिबंधीत वस्तू बाळगणार नाही. मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या परिसरात सार्वजनिक सभा घेता येणार नाही. मतदान केंद्राचे परीसरात मतदानाचे कालावधीत ध्वनी प्रक्षेपणाच्या वापरावर बंदी राहील. मतदान केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. मतदान केंद्राचे परिसरात अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. मतदान केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती/वाहनाच्या प्रवेशास मनाई राहील. मतदान केंद्राचे १०० मिटरच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास किंवा त्यांचे कार्यकर्त्या प्रचार व प्रसार करता येणार नाही. कोवीड-१९ मुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने यापुर्वी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन बंधनकारक राहील अशा आदेशांचे पालन सर्वाना करणे अनिवार्य असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरचे आदेश मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी, मतदान केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. सदरचे आदेश दिनांक २९नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजेपासून ते ०१ डिसेंबर चे रात्री १२.०० वाजेपर्यत संबंधित मतदान केंद्राचे ठिकाणी अंमलात राहील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.