Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भामरागड एकलव्य स्कुलची 26 फेब्रुवारी 2023 ला प्रवेशपुर्व परिक्षा

5 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भामरागड 27, डिसेंबर :-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वी वर्गातीत अनुशेष भरुन काढण्याची शासकीय / अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अनुसुचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परिक्षेचे आयोजन रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळेत करण्यात येत आहे.

इयत्ता 6 वी ते 9 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या (शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 5 वी ते 8 वी मध्ये शिकत असलेल्या) अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडुन ऑफलाईन पध्दतीने दिनांक 28.12.2022 ते 05.02.2023 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने इच्छुक विद्यार्थी / पालकांनी सदरहू अर्ज पुर्णपणे भरुन आवश्यक कागदपत्रांसह विहित तारखेस सादर करावे. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लक्ष पेक्षा कमी असावे. सदरची प्रवेशपुर्व परिक्षा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ताडगाव ता. भामरागड जि. गडचिरोली व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कसनसूर ता. एटापल्ली जि. गडचिरोली या केंद्रावर दोन घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरुन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. शुभम गुप्ता (भा.प्र.से.), प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांनी केलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.