Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सशस्त्र सेना धवजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १०१ टक्के पूर्ण केल्याने चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांचा मा.जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर 28, डिसेंबर :-  दि.७ डिसेंबर रोजी, सशस्त्र सेना धवजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १०१ टक्के पूर्ण केल्यामुळे मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, यांनी महावितरण, चंद्रपूर कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांना प्रशस्तीपत्र व स्मरणचिन्ह प्रदान करून गौरवान्वित केले.
याप्रसंगी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी,चंद्रपूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन व महानगरपालिका आयुक्त श्री. विपीन पालिवाल हे उपस्थित होते. चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर मंडळ व त्यांतर्गत तिन्ही विभागाच्या वतीने अधीक्षक अभियंता यांनी हा सन्मान स्वीकारला व कृतज्ञता व्यक्त केली. परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.