Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रोहयोअंतर्गत करोडोंची बोगस कामे दाखवून पैशाची उचल करण्यासंदर्भातील पत्राची दखल घेत चौकशी समिती अहेरी तालुक्यात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 28, डिसेंबर :-  रोहयो अंतर्गत करोडो रुपयांची बोगस कामे व काम न करता पैशाची उचल करण्या-या अधिका-यांवर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी 24 नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ कुमार आशिर्वाद यांना निवेदन सादर केले होते. निवेदनाची दखल घेत जिपचे सीईओ कुमार आशिर्वाद यांनी  22 डिसेंबरला पत्र काढून उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कणसे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
पंचायत समिती मुलचेरा, अहेरी व भामरागड या तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोहयोच्या कामात करोडो रुपयांची बोगस कामे व काम न करता पैशाची उचल केल्याच्या संदर्भात 27 डिसेंबरला चौकशी समिती मुलचेरा व अहेरी  तालुक्यात दाखल झाली आहे. त्यांच्यासोबत तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे व त्यांची चमु सुद्धा उपस्थित होती. या दौ-यादरम्यान चौकशी समितीला बयाण् व प्रकरणातील काही पुरावे सादर करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.