Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील शिक्षिकेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई 12, जानेवारी :- नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील प्रगती अशोक घरत (३५) या शिक्षिकेचा ट्रेन अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी बोरिवली रेल्वे स्थानकात गडबडीत धावती लोकल पकडतना तोल जाऊन लोकल आणि फलाटाच्या मधे सापडल्या आणि तिथेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या मालाडच्या राणी सती इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

प्रगती घरत या नालासोपारा येथून बोरिवलीला उतरल्या त्यानंतर मालाडला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरची स्लो लोकल पकडत असताना लोकलच्या दरवाजातील खांब हातातून निसटल्याने, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधल्या पोकळीत पडून हा अपघात झाला. त्यामुळे पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेन यांच्यातील मधल्या अंतराचा (पोकळीचा) मुद्दा समोर आला आहे. प्रगती यांच्या पश्चात त्यांचे पती, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.प्रगती घरत यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण कळंब गावावर शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.