Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

IND vs NZ, 2nd ODI : उत्कृष्ट गोलंदाजीनंतर भारताचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

रायपूर 21 जानेवारी :- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा दुसरा सामना आज रायपूर रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडला. या सामन्यात भारताने 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारताने प्रथम टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्यात आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतानं बाद केलं. त्यानंतर 109 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8विकेट्सनी सामना जिंकला.  सामन्यात गोलंदाजीत सर्वांनी उत्तम कामगिरी केली. शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मानं अर्धशतक झळकावलं.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर मायकेल ब्रेसवालने 22 आणि मिचेल सँटनरने 27 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर संघर्ष केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात… खाजगी ट्रॅव्हल्स झाली पलटी 25 ते 30 प्रवासी जखमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.