Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात… खाजगी ट्रॅव्हल्स झाली पलटी 25 ते 30 प्रवासी जखमी

अपघातानंतर ट्रॅव्हल्स च्या बाजूला उभे असलेल्या एका प्रवाशाला भरधाव ट्रकने चिरडले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

बुलढाणा 20 जानेवारी :- समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर ११ डिसेंबर ते १९ जानेवारी म्हणजे ४० ते ४५ दिवसांत जवळपास २० अपघात झाले आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दुसऱ्या दिवशी इथे अपघाताची घटना घडत आहे. समृद्धी महामार्गावर अनियंत्रित वेग याला आता कुठे तरी आवर घालणे गरजेचे आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अपघातांची जणू मालिका सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे.  सकाळी चार वाजता पुन्हा एकदा नागपूर येथून औरंगाबाद कडे जाणारी एक ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावर असोला गावाजवळ पलटी झाली. या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. यावेळी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे. हा अपघात आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा मृत्यू मार्ग झाला की काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या अपघातांचे नेमके कारण शोधणे गरजेचे झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.