सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेतर्फे सांस्कृतिक महोत्सव
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी 1 फेब्रुवारी :- अहेरी तालुक्यातील राजाराम येथील सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्याचे सुप्त गुण विकसित व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार,अध्यक्ष मनून डॉ. सुंदर नैताम, प्रमुख अतिथी व भास्करभाऊ तलांडे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून सुरू करण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या वतीने शासकीय कार्यालयांना संविधानाच्या प्रस्तावना वाटण्यात आले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने संविधानाची प्रत,शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.तसेच सैराट कन्हैया लावणी ग्रुप डान्स वडसा,महापुरुषांच्या जीवनावर आधारित नृत्य व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.हनुमंत आकदर,संस्थेचे सचिव सौ.सुरक्षाताई आकदर,मनोज आकदर, मधुकर गोंगले,भास्कर दुर्गे यांनी सहकार्य केले, गावातील व बाहेर गावातील समस्त जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा :-
https://youtube.com/live/ISjOTRl2shI?feature=share
https://youtube.com/live/rXU0sHfiNb0?feature=share


Comments are closed.