उमानूर येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आ. दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
आरिष क्रिकेट क्लब मंडळाकडून भव्य टेनिस बॉल सामन्याचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी 20 फेब्रुवारी :-अहेरी तालुक्यातील सुद्धगुडम (उमानूर) येथे आरिष क्रिकेट क्लब मंडळाकडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी टेनिस बॉल क्रिकेट विषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.
या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके तर प्रमुख पाहुणे म्हणून तारक्का आसम माजी सरपंच उमानूर, कविताताई कुमरे ग्रा. पं. सदस्य, लक्ष्मीस्वामी अट्टला, शामराव गावडे, पोचमजी संपत, राजुबाई सातपुते, येरन्नाजी बेडके, किष्टय्या सोदारी, विनोद कावेरी,जुलेख शेख,संदीप बडगे,अस्लम शेख,सोनू गोमासे,दिग्दर्शन कुंमरी,गंगाधर गेडाम,सतीश गेडाम,गौतम कोरडे,नागराज कोंडा,किशोर सडमेक,राजकुमार सोदारी,समय्या बंडावार,राजन्ना बोरकुटे सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.
आरिष क्रिकेट क्लब मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोनू गोमासे यांनी मानले.या क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला उमानूर परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा :-


Comments are closed.